फुलराई गावातील भोले बाबाच्या सत्संगातील चेंगराचेंगरीचा लेखाजोखा

0

 

उत्तरप्रेदेश 

 

भक्ती ही आजवरची सर्वात जुनी अशी श्रद्धेची परिभाषा आहे. मात्र भक्ती ही कुणाची कारवाई आणि कुणाची नाही याचाही संदर्भ हा संत परंपरेने करवून दिला आहे. भक्तीचा महिमा जरी अगाध असला तरी तिचा अतिरेक किती भयंकर असू शकतो याची प्रचीतीही वेळोवेळी आलीच आहे. हल्ली तर भक्ती ही समजून उमजून करण्याची प्रक्रिया झाली आहे. याला कारण ठरते ती म्हणेज समाजात वाढलेली भोंदुगिरी.. समाजाने यातून बोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र तरीही अश्या घटना घडतात, ही एक शोकांतिकाच आहे. अश्याच एका घटनेने पुन्हा देशभरात शोक  व्यक्त केला जात आहे.

 

उत्तर प्रदेशातील हाथरस या जिल्ह्याच्या शहरापासून सुमारे ४०  किमी अंतरावर असलेल्या फुलराई गावात मंगळवारी एका सत्संगात भयंकर मोठी चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १२१  पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वयंघोषित संत विश्व हरि नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संग दरम्यान ही भयंकर चेंगराचेंगरी झाली. या कार्यक्रमासाठी जवळपास सव्वा लाख भाविक आले होते. याच सत्संगच्या कार्यक्रमानंतर बाबाच्या दर्शनसाठी आल्याल्या भक्तांमध्ये ही चेंगराचेंगरी झाली.

दुर्घटनेनंतर मंत्री, डीजीपी सर्वांनी घटनास्थळावर धाव घेतली. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांना आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

फक्त ४० पोलिसांचा बंदोबस्त

या सत्संगाची परवानगी घेण्यात आली होती. हजारो जणांची गर्दी घटनास्थळी जमणार होती. परंतु त्यासाठी केवळ ४० पोलिसांचा बंदोबस्त होता, असा दावा केला जात आहे. तसेच रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. भोले बाबाचे सत्संग संपल्यानंतर धावपळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरी झाली.

 

घटनेनंतर भोले बाबा फरार

या दुर्दैवी घटनेनंतर भोले बाबा फरार झाले आहेत. प्रशासन मात्र ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात गर्दी जास्त होती आणि बंदोबस्तासाठी पुरेसा फोर्स नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या अपुऱ्या उपाययोजनेसंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

घटना नेमकी कशी घडली

फुलराई मैदानावर उघड्यावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील ५० जहर पेक्षाही जास्त बाबांचे अनुयायी यात सहभागी झाले होते. सत्संग संपल्यावर भाविक पुढे आले आणि बाबांजवळ जमा झाले आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्या चरणांची धूळ माथी लावण्यासाठी प्रचंड गर्दी करू लागले. त्या ठिकाणी एक खड्डा होता.  आणि हेच निमित्त पुरेसे ठरेले. धक्का लागल्याने काही लोक सुरुवातीला या खड्यात पडले आणि धावपळ सुरु झाली. दुर्दैव हे की जे लोक खाली पडले ते पुन्हा उठू शकले नाही. गर्दी त्या खाली पडलेल्या लोकांच्या आंगावरुन चालत होती. आणि या दुर्घतेनेन विद्रक स्वरूप प्राप्त केले. ही संपूर्ण माहिती घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली.

 

कोण आहे स्वयंघोषित संत भोले बाबा?

स्वयंघोषित संत साकार विश्व हरि भोले बाबा हे २६  वर्षांपूर्वी पोलीस विभागात शिपाई पदावर तैनात होते. पण अचानक त्यांनी पटियाली गावातील बहादुरीनगर येथे आपल्या झोपडीत सत्संगची सुरुवात केली. कुणा एकासोबत बातचित करताना भोले बाबाने दावा केला होता की, त्यांचा कुणी गुरु नाही. सलग १८ वर्षे पोलिसात काम केल्यानंतर त्यांनी इच्छा निवृत्ती घेतली. त्यांना परात्माचा साक्षात्कार झाला. अध्यात्माशी जास्त जवळ गेल्यानंतर त्यांनी सत्संग सुरु केलं. हळूहळू अनेक लोक या विश्व हरिच्या प्रभावाखाली येऊ लागली. आता तर या विश्व हरिचा दरबार अनेक एकर जमिनीत भरवले जातात.  भोले बाबा कधी एकेकाळी पोलीस खात्यात नोकरी करायचे. आता ते स्वत:ला परात्माचा चौकीदार असल्याचं सांगतात. तर त्यांच्या असंख्य भक्तांचं म्हणणं आहे की, भोले बाबा हे देवाचे अवतारच आहेत.  भोले बाबा हे आपल्या पत्नीसह आसनावर बसून सत्संग देतात. तो अनेकदा पांढरा सूट पँट घालतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिथे जिथे भोले बाबांचा सत्संग असतो तिथे त्यांचे अनुयायी संपूर्ण व्यवस्था सांभाळतात.

बाबाची कीर्ती सर्वदूर

या भोले बाबांचा प्रभाव हा पश्चिम युपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत पसरलेला आहे.  पटियाली तालुक्यातील बहादुरनगरही गावातून निघालेल्या भोले बाबाचा प्रभाव अनेक ठिकाणी पडला आहे.  एटा, आगरा, मैनपुरी, शाहजहांपूर, हाथरससह अनेक जिल्ह्यांमध्ये या स्वयंघोषित भोले बाबाने आपलं वर्चस्व आणि प्रभाव निर्माण झालाय. याशिवाय मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये देखील या भोले बाबाचा चांगला प्रभाव आहे. भोला बाबाच्या भक्तांमध्ये सर्वाधिक नागरीक हे जाटव-वाल्मिकी आणि इतर मागासवर्गीय जातींचे गरीब नागरीक आहेत. त्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. भोला बाबाच्या स्वत:ला देवाचे सेवक मानतात. पण त्यांचे भक्त त्यांना देवाचा अवतार मानतात.

 

स्वयंसेवकच सांभाळतात सर्व व्यवस्था

भोले बाबाच्या सत्संगला जे लोक जातात त्यांना प्रसाद म्हणून पाणी दिलं जातं. बाबाच्या अनुयायांचं म्हणणं आहे की, पाणी पिल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. अनेक जण हे पाणी बाटलीत भरुन सोबतही घेऊन जातात. बाबाचं बहादूरनगरी गावात असलेल्या आश्रममध्ये दरबार भरवला जातो. इथे आश्रमच्या बाहेर हँडपंप असतो. तिथेदेखील हँडपंपचं पाणी पिण्यासाठी मोठी लाईन लागते. दरम्यान, भोले बाबाच्या अनुयायांकडून कार्यक्रमाच्यावेळी रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढाकाराने काम केलं जातं. भाविकांना त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. ड्रम भरुन रस्त्यांवर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते.

 

आसाराम बापूचा प्रकरणाने बाबा मिडीयापासून दूर

आसाराम बापूचं प्रकरण समोर आल्यानंतर भोले बाबाने मीडियापासून दुरावा निर्माण केला होता. त्यावेळी बाबा आपल्या समर्थकांनाही फोटो काढण्यास मनाई करायचे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या सुरक्षेतील महिला कमांडोदेखील काढून टाकले होते. त्यांनी २०१४ मध्ये एका प्रवचनात आसाराम बापूचा उल्लेखही केला होता. मीडियाने आसारामला बदनाम केलं आहे, असं भोले बाबा म्हणाले होते. या भोले बाबाच्या सत्संगला उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मोठमोठे नेते हजेरी लावतात. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मोठमोठे नेते इथे येतात.

मृतदेहांचा खच अन भीतीने शिपायाला हार्ट अटॅक

श्वास कोंडल्यामुळे बहुतांश मृत्यू झाले, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या भाविकांचे मृतदेह आणि जखमी लोकांना एटा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे एवढ्या मोठ्या संख्येने मृतदेह पाहून रुग्णालयात तैनात असलेल्या एका शिपायाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हा शिपाई अवागड येथे तैनात होता. आपत्कालीन परिस्थिती पाहून त्याला एटा येथे पाठविण्यात आले. मात्र, तेथील परिस्थिती पाहून तो ताण सहन करू शकला नाही.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. घटनेची माहिती मिळाली त्यावेळी त्यांचे लोकसभेत भाषण सुरू होते. ते थांबवून मोदी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मृत्युमुखी पडलेल्यांप्रति मी संवेदना व्यक्त करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.