मराठा आरक्षण रद्दच्या निषेधार्थ केंद्र सरकार व राज्य सरकारचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाची अनेक वर्षांपासून मागणी होती.  मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने राज्यभर मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे काढले ४२ मराठा बांधवांनी आत्मबलीदान दिले. मराठा समाजाला आरक्षणाची  खऱ्या अर्थाने गरज होती.मात्र असे असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही.

सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा तरूण देशोधडीला लागून त्यांचे भाविष्य अंधकारमय झाले आहे दोन्ही सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही म्हणून मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने केंद्र व राज्य  सरकारांचा दि ५ रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव  तहसीलदार कार्यालया समोर  निषेध करून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, प्रमोद पाटील, अरुण पाटील, खुशाल पाटील, भाऊसाहेब सोमवंशी, पप्पू पाटील, योगेश पाटील, राजेंद्र पगार, अविनाश काकडे, अमोल पाटील, सनि मराठे, आकाश धुमाळ, दिपक देशमुख अदि सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.