खामगावात गुटख्यासह 80 हजाराचा माल जप्त

0

खामगाव (प्रतिनिधी):- शिवाजीनगर पोलिसांनी आज 30 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजताचे सुमारास फरशी भागात प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणार्‍या एकास पकडून त्याचेजवळून दुचाकीसह 80 हजार 110 रूपयाचा माल जप्त केला आहे.

याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुर्यकांत  विजयकुमार पुरवार रा. जुनी मस्जिदजवळ सराफा हा दुचाकीवर प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला फरशी भागात पकडले. त्याचे ताब्यातून तसेच त्याचे घरातून विमल पान मसाला व दुचाकी असा एकुण 80 हजार 110 रूपयाचा माल जप्त केला आहे. पोकाँ बाळकृष्ण फुंडकर यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरूध्द शिवाजीनगर पोलिस स्टेशलना गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक चावरिया, एएसपी हेमराजसिंह राजपूत, एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनिल हुड यांच्या आदेशान्वये पीएसआय मनोज खुंटे, पोना देवेंद्र शेलके, संदीप टाकसाळ, पोकाँ रविंद्र कन्नर, बाळकृष्ण फुंडकर, सागर भगत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.