तक्रार करण्याऐवजी खांद्याला खांदा लाऊन काम करा ; माजी आ.शिरीष चौधरी

0

अमळनेर : कोरोना महामारीत खानदेशात मृत्यदर वाढला आहे. एकीकडे लोकांचे प्राण वाचवणे महत्वाचे आहे. मात्र, आमदार अनिल पाटील गलिच्छ राजकारण करत आहेत. त्यांनी तक्रार करण्याऐवजी माझ्या खांद्याला खांदा लाऊन काम करावे. त्यांनी केलेल्या तक्रारीचा निषेध करत असल्‍याची टीका माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आपण गरजू रुग्णांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भेटून काही कंपनीकडे उपलब्ध असलेला साठा एक्स्पोर्ट करून जनतेला उपलब्ध करून घ्यावा; अशीही मागणी आपण केली आहे. मात्र, यात महाविकास आघाडी राजकारण करीत आहे. आमच्याकडे रेमडिसिव्हीरबाबतचे सर्व परवानेही आहेत. आजही शासनाने परवानगी दिल्यास आपण दहा लाख इंजेक्शन उपलब्ध करून जनतेचे प्राण वाचवू शकतो.

विद्यमान आमदार लोकांचे काम आले की एकदा नव्हे दोनदा कोरोना पॉझिटीव्ह होतात. दुसरीकडे त्यांचा दोनच दिवसात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोटो झळकतो. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून त्यांना लोकांच्या जीवाची काहीही पडलेली नाही. कमिशनमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. त्यांनी हे राजकारण थांबवून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी. त्यांनी तक्रार करण्याऐवजी अमळनेरकारांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. आम्ही जनतेच्या सेवेसाठी बांधील असून, कुणाचे प्राण वाचत असतील तर त्यांनी शंभर गुन्हे दाखल केले तरी आम्ही जनतेची सेवा अविरत सुरू ठेवू, असेही त्यांनी शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.