पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी गावात कोरोना प्रतिबंध फवारणी करुन केला वाढदिवस साजरा

0

धानोरा ! प्रतिनीधी : चुंचाळे ता.यावल – सौखेडासिम ता.यावल येथील कर्तव्यदंक्ष पोलीस पाटील पंकज बडगुजर  पोलीस पाटील म्हणुन कार्यरत आहे तसेच  प्रगतीशिल शेतकरी पुत्राने आपल्या स्वताच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारे बडेजावपणा न करता गावात प.स.सदस्य शेखर पाटील व मित्र परिवाराच्या मदतीने कोरोना प्रतिबंध फवारणी करुणआपला आगळावेगळा वाढदिवस साजरा केला

सध्या सर्वत्र कोरोनात जनता भयभीत झाली आहे साऱ्या देशात थैमान माजवणारा कोरोनाचा कहर दिवसेनदिवस वाढतच आहे त्यासाठी शासन आपल्या विविध विभागामार्फत कोरोना रोखण्यात सर्वोपरी प्रयत्न करत आहे त्या व्यतिरिक्त उद्योजक व मोठे व्यावसायिक आणी प्रतिष्ठित व्यक्ती कोरोना रोखण्यासाठी आर्थिक मदतीला पुढे येत आहे असाच आदर्श सावखेडासिम येथील कर्तव्यदंक्ष पोलीस पाटील पंकज जिवराम बडगुजर यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त गावात कोरोना जिवाणू प्रतिबंध साठी प्रयत्न म्हणून फवारणी करुन गावहिताच्या विचाराने वाढदिवस साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी त्याना फवारणी यत्र प.स.सदस्य शेखर पाटील यांनी निशुल्क उपलब्ध करुण देत तुमच्या हातून असेच सत्कार्य घडो अश्या शुभेंच्छा दिल्या याप्रंसगीअजय पाटील सर, गणेश पाटील,राहुल बडगुजर,फारुख तड़वी,सलिम तड़वी, विनायक पाटील, देवीदास पाटील, चंदू जावळे, अभिजित  साळवे, छोटु पाटील,पराग पाटील, लक्ष्मण बडगुजर, उस्मान तड़वी,श्रीराम मदीर ग्रुप   शेखर पाटिल  ग्राम पंचायत आणी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.