इंधन दर ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे दर

0

मुंबई : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र देशांतर्गत बाजारात इंधन दराबाबत कंपन्यांनी तूर्त तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.

आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता.

जागतिक बाजारात सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.१० डॉलरच्या घसरणीसह ६२.६२ डॉलरवर बंद झाला. तर यूएस टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.१० डॉलरच्या घसरणीसह ५९.२४ डॉलर प्रती बॅरल झाला. २०२० या वर्षात अमेरिकेत कच्च्या तेलाच्या मागणीत तब्बल ९३ क्वाड्रिलियन ब्रिटिश थर्मल युनिटची घट झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.