उन्हाळ्यात ताक पिण्याचे हे आहेत फायदे, वाचा !

0

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला दिवसा खूप थंड गार पाणी पिल्याने बर वाटते ना? हो ना मग तसच ह्या दिवसात ताक पिणे ही खूप च फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ताक पिल्याने आपली त्वचा देखील चांगली राहते. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. ताक पिल्ल्याने आपले शरीर थंड देखील राहते. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात दिवसातून कमीत-कमी एक ग्लास तरी ताक पिले पाहिजे.

-ताक पचनासाठी अत्यंत हलके असते. ताकामुळे पचनाचे असलेले सर्व विकार दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपली पचनप्रक्रिया चांगली आणि सुरळीत होण्यास मदत देखील होते.

-ताक पिल्ल्याने आपली त्वचा देखील चांगली होते. तसेच चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास नक्की मदत होईल.

-जर तुम्हाला अपचना संदर्भातील काही समस्या असतील तर तुम्ही आहारामध्ये रोज ताक घ्या यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. बऱ्याच वेळी डाॅक्टर देखील ज्यालोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना ताक पिण्याचा सल्ला देतात.

-बऱ्याच लोकांना साधे ताक पिऊ वाटत नाही. मग अशावेळी तुम्ही ताकात जिरे पुड, मीठ आणि कोथींबीर घालू शकतात. किंवा पोळवलेले ताक देखील घरी तयार करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.