शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! डीएपीच्या किंमतीमध्ये वाढ न करण्याचा कंपनीचा निर्णय, जाणून घ्या किंमती

0

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आधीच इंधन दर वाढीमुळे सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना महागाईची झळ बसत आहे. शेतकऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी समोर आलीय. जगातील सर्वात मोठी खत पुरवठा कंपनी इफकोनं 31 मार्चपर्यंत खतांच्या किमती कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. इफकोनं 31 मार्च 2021 पर्यंत डीएपी (DAP), एनपीके (NPK) आणि एनपीएस उर्वरकाच्य किंमतीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. इफकोने केलेल्या घोषणेनुसार डीएपीची किंमत 1200 रुपये, एनपीके 1175 रुपये आणि एनपीएस 1185 रुपये यांना एक पोते मिळेल. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी दरांमध्ये वाढ करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

इफकोनं गतवर्षीच्या रब्बी हंगामात देखील खतांच्या दरांमध्ये वाढ केली नव्हती. इफकोचे एमडी यू.एस. अवस्थी यांनी ट्विटर ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्याशी निगडीत असा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलांच्या किमती आणि भारतातील वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

इफकोकडे भारतामध्ये 5 उर्वरक संयंत्र आहेत. खतनिर्मिती क्षेत्रात इफको देशातील सर्वात मोठी संस्था आहे. इफकोने सामान्य विमा, ग्रामीण दूरसंचार, कृषी रसायन, खाद्यप्रक्रिया और जैविक शेती क्षेत्रात गुंतवणूक करुन नफा वाढवला आहे. गेल्या 54 वर्षांमध्ये इफको भारतीय शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर करत उच्च प्रतीचं खत पुरवठा करण्याचा प्रयत्न केलाय. इफको भारतात उत्पादित होणाऱ्या फॉस्फेटिकमध्ये 32.1 टक्के, यट्रोजन उर्वरक निर्मितीत 21.3 टक्के योगदान देते. फॉर्चून 500 भारत कंपन्यांच्या यादीमध्ये इफको 57 व्या स्थानावर आहे.

भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी हरित क्रांतीनंतर (1965-66) यूरीयाचा वापर सुरु करण्यात आला. 1980 मध्ये 60 लाख टन यूरिया वापरला जात होता. 2017 मध्ये यूरियाचा वापर 3 कोटी टनापर्यंत पोहोचला. 2018-19 मध्ये 320.20 लाख टन यूरीयाची विक्री झाली. तर, 2019-20 मध्ये 336.97 लाख टन यूरिया विकला गेला. पीएम नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नीम कोटेड यूरिया वापरण्याचा सल्ला दिला आहे. नीम कोटेड यूरियामुळे सामान्य यूरियापेक्षा प्रदूषण कमी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.