अमळनेर बाजार समितीत पुन्हा सत्तांतर

0

 

अमळनेर(प्रतिनिधी) :  अशासकीय संचालक मंडळ बरखास्त करत पुन्हा एकदा विद्यमान संचालकांकडे बाजार समितीचा कार्यभार न्यायालयाच्या आदेशाने आला आहे.

कोरोनाच्या काळात निवडणूक घेता येत नसल्यामुळे अमळनेर बाजार  समितींवर विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाकडे संचालक मंडळाने अर्ज केलेला होता,मात्र जिल्ह्यातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या

बहुतांश बाजार समितीवर शासनाने आधी प्रशासक नेमला होता,त्यानंतर शासनाच्याच आदेशाने अशासकीय संचालक मंडळ काही दिवसांपूर्वीच बसविण्यात आले होते. याविरुद्ध अमळनेर येथील संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली, बाजार समितीच्या संचालकांनी पाठवलेल्या मुदतवाढीचा अर्जावर मुदतीत निर्णय घ्यावा व तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज पहावे असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असल्याचे  बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

त्यानुसार त्यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारला आहे.यावेळी माजी आमदार स्मिता वाघ व बाजार समितीचे संचालक मंडळ उपस्थित होते.

न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा एकदा पदभार हाती घेतला आहे,राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा येत्या काळात प्रयत्न करू

– प्रफुल्ल पवार, सभापती
अमळनेर बाजार समिती

जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी व सेनेच्या च्या ताब्यातील बाजार समितीना मुदतवाढ दिली मात्र ज्या बाजार समित्या भाजपा च्या ताब्यात होत्या त्यावर प्रशासक नेमण्यात आले.

भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही या उक्तीप्रमाणे मा.न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे.त्यानुसार येत्या काळात शेतकरी बांधवांसाठी जोमाने काम करू.

– स्मिताताई वाघ
(माजी आमदार)

Leave A Reply

Your email address will not be published.