कनाशी येथे मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन बालकांसह आत्महत्या

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कनाशी येथे राहत असलेल्या गायत्री दिनेश पाटील ( वय ४३), मुलगा- खुशवंत दिनेश पाटील (१० वर्ष ) मुलगी-भैरवी दिनेश पाटील (८ वर्ष) असे आई मुलगा मुलगी तिघांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे .या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की , मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी गायत्री हिस  पती -दिनेश निंबा पाटील, सासू- पमा निंबा पाटील , सासरे – निंबा रामदास पाटील , जेठ-बबन निंबा पाटील, जेठाणी-सोनी बबन पाटील अशांनी थ्रेशर मशीन घेण्यासाठी मशीन घेण्यासाठी पन्नास हजार रुपये (५०,०००/-) व कनाशी येथे प्लॉट घेण्यासाठी (१,५०,०००/-) दीड लाख रुपयांची वेळोवेळी मागणी करून तिला प्रसंगी मारहाण, शिवीगाळ, करून शारीरिक व मानसिक त्रास दिला म्हणून तिला त्रास असह्य झाल्याने मुलगी गायत्री हिने दि २४ रोजी सकाळी ६ वाजेच्या पूर्वी शेतातील विहिरीत दोन मुलांसह खुशवंत व भैरवी अशाना घेऊन आत्महत्या केली म्हणून  दिलीप पुंडलिक पाटील (वय ६३) व्यवसाय शेती, रा वाघाडी बु। ता शिंदखेडा जि. धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई- दिनेश निंबा पाटील, सासू- पमा निंबा पाटील , सासरे – निंबा रामदास पाटील , जेठ-बबन निंबा पाटील, जेठाणी-सोना बबन पाटील यांच्या विरुद्ध भडगाव पोलिसात भाग ५, कलम  ३०६, ४९८, ३२३, ५०४, ३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे हे तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.