गरुड विद्यालयात चिंतन दिन साजरा

0

शेंदुर्णी:-धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी याठिकाणी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त चिंतन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व स्काऊट-गाईड शिक्षक उपस्थित होते त्यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्याचे पूजन केले केले यानंतर स्काऊट गाईड शिक्षक शिक्षकांनी यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले बद्दल मनोगत व्यक्त केले व त्यांच्या कार्याची महती सांगितली यावेळी या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंग पालन करून कार्यक्रम साजरा केला गेला.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी उदार, उपमुख्याध्यापक एस. सी.चौधरी ,पर्यवेक्षक आर.एस. परदेशी, विद्यालयाचे स्काऊट प्रमुख डी .बी .पाटील, गाईड प्रमुख के.डी.पाटील मॅडम,सर्व स्काऊट गाईड शिक्षक शिक्षिका इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.