नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी)दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी येथील नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव हे होते तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. आर.पी. निकम होते.त्याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.डॉ. एस.डी. महाजन ,उपप्राचार्य प्रा. डॉ.यु. आर. मगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर .जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत माल्यार्पण व पूजन केले.

प्रा. डॉ.आर.पी. निकम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी  केलेले उल्लेखनीय कार्य ,त्यांनी उभारलेले स्वराज्य त्यासाठी केलेले प्रयत्न एवढेच नाही तर शाहिस्तेखान अफजलखान यांच्या बरोबर केलेला संघर्ष आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर डावपेचात्मक  केलेले बोलणे या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सांगून मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .आर .जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण त्याचप्रमाणे समाजाला संघटित करण्याचे कौशल्य तसेच रयतेवर असलेले जिवापाड प्रेम ,महिलांच्या संदर्भातील  असलेला आदरभाव, स्वराज्याची निर्मिती ,स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी उभारलेली सैनिकांची फळी, नियोजनबद्ध व दुरदृष्टीने केलेला राज्यकारभार जनतेला लाभदायक ठरला. आपण सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व त्यांचे कार्य अंगीकारा असे आव्हान उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांनी मार्गदर्शन केले .तसेच प्रा.डॉ. सौ.एन.पी.गोल्हार,प्रा.एम.एस. बेलदार, श्री.ए.बी.सूर्यवंशी, श्री.एन.एस. कांबळे यांनी सहकार्य केले. शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. एस.डी. महाजन यांनी केले .आभार उपप्राचार्य डॉ. यु.आर.मगर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.