सोन्या-चांदीत घसरण ; आतापर्यंत सोन्याचे भाव 8000 रुपयांनी घसरले

0

नवी दिल्लीः  मागील काही दिवसांपासून सुरु असलेली सोन्या-चांदीतील घसरण अद्यापही सुरूच आहे. सोन्याचे भाव शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात प्रतिदहा ग्रॅम 48,487 रुपयांवर आले. एमसीएक्सवर व्यापार करताना सोन्याच्या किमती दहा ग्रॅमसाठी 48415 रुपये एवढ्या घसरल्या आहेत.

ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव प्रतिदहा ग्रॅम 56,379 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, जे आता प्रतिदहा ग्रॅमसाठी घसरून सुमारे 48,487 रुपयांवर आले आहेत. कोरोना लसीच्या बातमीमुळे गुंतवणूकदारांना सोन्याच्या ऐवजी इक्विटी बाजारातील गुंतवणूक अधिक सुरक्षित वाटत आहेत. ज्यामुळे जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतो आहे.

चांदीतही घसरण सुरूच

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण होत असल्याची चित्र आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात एमसीएक्सवरील चांदीचे दर घटून 59,438 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. तर ऑगस्ट महिन्यात एक किलो चांदीची किंमत सुमारे 79000 हजार रुपये होती. चांदीच्या घसरणीविषयी बोलताना ऑगस्टपासून किंमत 20,000 रुपयांनी खाली आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.