मंगरूळ-अमळनेर दरम्यान मोटारसायकलस्वार डॉक्टरला लुटले

0

अमळनेर : डांगर येथून मोटरसायकलवर अमळनेर येणाऱ्या एक मोटरसायकलस्वार डॉक्टरला  चौघांनी चाकु लावून लुटल्याची घटना 19 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाजवळ घडली

डांगर येथील डॉ शिवदास मखराम राठोड हे 19 रोजी रात्री 8 वाजता डांगर कडून अमळनेर येत असताना  मंगरूळ येथे  जवळ सेंट मेरी शाळेच्या जवळ दोन मोटरसायकलवर चार अज्ञात तरुण आले व त्यांनी पेट्रोल पंप कुठे आहे असे विचारून त्यांना रस्त्याच्या  बाजूला असलेल्या खड्ड्यात त्यांना बळजबरीने नेले त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची बॅग असल्याचे तरुणांना भरपूर रक्कम असल्याचा संशय आला त्या तरुणांनी राठोड याना चाकु लावून धाक दाखवला आणि हाताला चाकु मारला त्यांच्या हाताला जखम झाली त्यांच्या खिश्यातून बळजबरी 700 रुपये काढून घेतले व मोटरसायकलीने पळून गेले. राठोड उपचारासाठी श्री अक्सिडेंट हॉस्पिटल मध्ये आले.घटनेचे वृत्त कळताच ए पी आय प्रकाश सदगीर व पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी घटनास्थळी रवाना झाले, मात्र आरोपींचा तपास लागू शकला नाही राठोड यांचा दवाखाण्यात जबाब घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला चार अज्ञात आरोपींविरुद्ध लूटमार व शस्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करत आहेत.  काही दिवसांपूर्वी देखील धुळे रोडवर अशाच पद्धतीने रस्त्यावर अडवून बाजूच्या खड्डयात नेऊन एकाला चाकु लावून  लुटण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.