केंद्र सरकारने त्वरित कांद्याची निर्यात बंदी उठवुन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी

0

प्रा.हितेश पाटील,जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

जळगाव – कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनात शेतकरी हितासाठी केंद्र सरकारच्या विरुद्ध जळगाव जिल्हा युवक काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
गेल्या पंधरवड्यापासूनच कांद्याच्या भावात थोडी वाढ होत होती म्हणून कांदे उत्पादक शेतकरी आनंदीत व समाधानी दिसून येत होते.हा आनंद जास्त काळ न टिकता अल्पावधितच शेकऱ्यांच्या पदरी निराशा आली. केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी लावण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याने कांदे उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी कांदे उत्पादक शेतकरी यांच्या वतिने जळगाव जिल्हाअध्यक्ष युवक काँग्रेस प्रा.हितेश सुभाष पाटील यांनी व उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून उन्हाळी हंगामातील कांदयाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते.म्हणून काही शेतकऱ्यांनी मातीमोल भावामध्ये कांदा विकून टाकला तर काही शेतकऱ्यांनी कांदयाला पुढे भाव मिळतील या आशेवर थांबत कांदा चाळमध्ये ठेवून मोठा खर्च केला आणि आता गेल्या पंधरवड्यापासून कांदयाला थोडी-थोडी वाढ होत गेली म्हणून मोठी आशा लागली होती आता याआठवडा भरापासून कांदयाला बरा भाव मिळत असतांना कांदा तेजीत येईल अशा आशा व कांदयासाठी झालेला खर्च निघून हाती दोन पैसे मिळतील म्हणून शेतकर्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.पण केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा एकतर्फी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरुन आनंदाचा हीरमोड केला आहे.म्हणून केद्रंसरकारने तत्काळ निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा.शेतकर्‍याना कोविड १९ सारख्या महाभयंकर आजारात आपले योगदान दीले आहे.तरी शेतकर्‍यांना उचित न्याय ध्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.