कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावा

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :-चाळीसगाव येथे आज चाळीसगाव कांग्रेस च्या वतीने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावे म्हणून येथील प्रांताधिकारी साहेब लक्ष्मीकांत साताळकर साहेब तसेच मा.तहसिलदार श्री अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात नमूद करण्यात आले की

जगभरात लॉकडाऊन असताना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी आपले कांदा उत्पादन केले कांद्याला आता कुठेतरी चांगला भाव येऊ लागल्याने व  शेतकरी राजा चार पैसे हातात पडतील अशी त्यांची आशा असताना केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी बाबत निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी म्हणजे चार जून रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा-बटाटा डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती आणि तीनच महिन्यात केंद्र सरकारने घूमजाव करून निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा हा कांदा बंदीचा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना आपल्या या  कष्टाचे मोल मिळावे

अशी मागणी चाळीसगाव तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस ,काँग्रेस सेवादल च्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षअनिल निकम, शहर अध्यक्ष देवेंद्र पाटील सेवादल आर डी चौधरी अल्ताफ खान समशेर खान एडवोकेट प्रदीप सोनार प्राध्यापक एम एम पाटील प्रदीप देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आर के पाटील सुधाकर कुमावत पंकज शिरोळे सुनील राजपूत नितीन मोरे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.