सिब्बल-गुलाब नबी आझाद यांना भाजप प्रवेशाची ‘या’ नेत्यानं दिली ऑफर

0

नवी दिल्ली । काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून पक्षातंर्गत वादानंतर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्यावर पक्षातून टीका झाल्याचं समोर आलं होतं. काँग्रेसमधील 5 माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या. या पत्रानंतर झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर टीका झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. या टीकेचा हवाला देत या दोन्ही नेत्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेता गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांना काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करा, असा सल्ला दिला आहे.  “काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी गुलाम नबी आझाद व कपिल सिब्बल यांनी प्रचंड मेहनत घेतली. जर राहुल गांधीजी त्यांच्यावर आरोप करत असतील, तर त्यांनी पक्ष सोडावा. भाजपामध्ये त्यांचं स्वागत करण्यास तयार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्ध एनडीए सरकार सत्तेत कायम राहिल. पुढील अनेक वर्षे मागील लोकसभाप्रमाणे चित्र दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसच्या अन्य काही दिग्गज नेत्यांवर भाजपच्या सूरात सूर मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे राजीनामा देऊन या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्षांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.