शासकिय निवासी शाळेत वृक्षास राखी बांधुन विद्यार्थ्यांना देण्यात आला वृक्षसंवर्धनाचा संदेश

0

चाळीसगांव (प्रतिनीधी) : सामाजिक न्याय विभाग संचलित शासकिय निवासी शाळा चाळीसगांव येथील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे व शिक्षक ध्रुवास राठोड यांच्याकडुन शाळेतील वृक्षास राखी बांधुन विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकुण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात हे प्रमाण वाढण्या ऐवजी दिवसेंदिवस यात घट होतांना दिसुन येत आहे. ही घट थांबावी म्हणुन शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालु आहे; वृक्ष लागवड केली जात आहे.परंतु ते जगविणे गरजेचे आहे. वृक्ष आपलाच एक बांधव म्हणुन त्यास प्रत्येक नागरिकांनी वाढविले पाहिजे.याकरीता वृक्षसंवर्धनाचे मुल्य विद्यार्थीरुपी जीवनातच रुजविणे गरजेचे आहे. म्हणुन शाळेतील वृक्षास राखी बांधुन वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवुन देण्यात आले.

शाळेतीलउपक्रमशील शिक्षक श्री ध्रुवास राठोड यांनी कार्डशीट पेपरचा वापर करुन एक मोठ्या आकाराची व आकर्षक अशी ‘झाडे लावा,झाडे जगवा’ संदेश देणारी राखी तयार केली होती. ही राखी वृक्षास बांधुन विद्यार्थ्यांनाही रक्षाबंधन सणानिमित्त एक राखी वृक्षास बांधावे असे सोशल मेडियावर आवाहन करुन वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवुन देण्यात आले. याप्रसंगी सहा.शिक्षिका रुपाली सोनवणे, सुरक्षारक्षक भगवान पाटील यांची उपस्थिती होती. या सत्कृत्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.