जामनेरात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे रास्ता रोको आंदोलन

0

जामनेर ( प्रतिनीधी) : – राज्यात सात महीण्यांपुर्वी स्थापन झालेल्या उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार राज्यातील तमाम जनतेसह शेतकरी वर्गाला अपेक्षीत न्याय देऊ शकलेले नाही. असा घणाघाती आरोप राज्याचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी येथे केला. आज दि.१ रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुध उत्पादक आणी शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. रास्ता रोको आंदोलन स्थळी ते बोलत होते. आंदोलनाचे नेतृत्व आमदार महाजन यांनी केले.

आघाडी शासनाने सर्व चांगल्या योजना बंद केल्या
जिल्ह्यासह संपुर्ण तालुक्यातील चांगल्या योजना ज्या शेतकरी-कष्टकरी जनतेच्या हिताच्या होत्या,त्या सर्व थंड बस्त्यात टाकुन बंद करून टाकल्या,मका-कापुस खरेदी बंद आहे,शेतकऱ्यांच्या घरामधे माल पडून आहे,शेततळे,पाणी पुरवठ्यासारख्या योजनाही बंद केल्या.शेतकऱ्यांच्या बांधावर बि-बियाणे,खते देण्याची योजना फेल झाली असुन एकीकडे बोगस बियाणे तर दुसरीकडे पाहीजे ती खते शेतकऱ्यांना मिळत नाही, दुध उत्पादक शेतकरीही बेजार झाला असुन लकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही .तर यापेक्षा राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्रस्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असाही ईशारा माजीमंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांनी आपल्या भाषणात दिला. दरम्यान काहीकाळ सोशल डिस्टंगसींगचे पालन करून रास्ता रोको करण्यात आला.गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी सोबत आणलेली दुधाची क्यान दुधाची नासाडी न करता कोविड सेंटर ला देण्यात आली.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर,शिक्षण संस्थेचे सचिव जितु पाटील,जिपचे माजीअध्यक्ष दिलीप खोडपे,नवल पाटील,चंद्रशेखर काळे,बाबुराव घोंगडे, उल्हास पाटील,राजधर पांढरे, अमर पाटील,गोवींद अग्रवाल,अनीस केलेवाले,डॉ प्रशांत भोंडे,रवींद्र झाल्टे,महेंद्र बावीस्कर,आतीष झाल्टे,संजय देशमुख,तुकाराम निकम,नाजीम शेख,अरविंद देशमुख,आनंदा लाव्हरे,स्विय सहायक संतोष बारी,दिपक तायडे,बाबुराव हिवराळे , कैलास पालवे,आदींसह शेतकरी,कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.