कोथळीहून संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती राम मंदिर पायाभरणीसाठी रवाना

0

मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : वारकरी संतांचे चार धाम असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी -‌मुक्ताईनगर समाधीस्थळाची पवित्र माती व तापीपूर्णामय्याचे जल शरयुतीरी अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राचे जन्मभुमिवर ५ आगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिर पायाभरणी कार्यक्रमासाठी प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचे कडे भक्तीपूर्ण वातावरणात संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर अध्यक्ष रविंद्र पाटील, खासदार रक्षाताई खडसे यांनी मृत्तिकापूजन करुन कलश अखील भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपुर येथील महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांचे जवळ सुपूर्द केला.

५ आगस्ट रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रामजन्मभूमीवर राममंदिर यांचे हस्ते पायाभरणी होत आहे. देशभरातील संतपीठाची माती व पवित्र नद्यांचे जल पायाभरणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे त्याकरिता आज तापी पूर्णा संगमावर जल संकलीत केले . तसेच श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई समाधीस्थळाची माती जी संत मुक्ताई सातशे वर्षांपूर्वी विजेच्या रूपात अंतर्धान ज्या भुमीत‌ झाल्या व जेथे वारकरी संप्रदायातील अनेक थोर महापुरुष भुमीला नतमस्तक झाले अशी पवित्र मातीचे पूजन खासदार रक्षाताई खडसे व रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांचे हस्ते मंत्रोच्चारात करण्यात आले.नवग्रह पुजन पुरूषोत्तम वंजारी यांनी केले. श्रीरामांची आरती‌ करण्यात आली . याआधी चांगदेव संगमावर नावेने मध्यभागी जावून जलकलश भरण्यात आला.चांगदेव ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. दोन्ही कलश खासदार रक्षाताई , रविंद्र पाटील रविंद्र महाराज हरणे यांनी खानदेश विदर्भातील रामभक्तांचे वतिने जयघोषात प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केले महाराज रविवारी पहाटे अयोध्या रवाना होणार आहेत.

सोबत शेखर वानखेडे जाणार आहेत. कार्यक्रमास जिल्हा बँक अध्यक्षा रोहीणीताई खेवलकर,राजेंद्र फडके, रविंद्र महाराज हरणे, निवृत्ती पाटील, विनायकराव पाटील, महंत नितीन महाराज ,विशाल महाराज पाटील, उध्दव महाराज जुनारे, पंकज महाराज, उमेश राणे, पंकज राणे, समाधान महाराज भोजेकर, कन्हैया महाराज, करून महाराज ,कृष्णा गुरूजी,नरेंद्र नारखेडे, परिक्षित बराटे,भावराव महाराज, मनोहर रोकडे व मुक्ताबाई फडावरील भाविकांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.