वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी पालिकेकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा

0

अन्यथा नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांचा स्वातंत्र्य दिनी उपोषणाचा इशारा

अमळनेर (प्रतिनीधी) : वैशिट्यपूर्ण योजनेतील निधी पालिकेकडे पुन्हा हस्तांतर करण्यासंदर्भात अमळनेर नगरपरिषदेने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद दाखल केलेल्या रिट याचिकेच्या आंदेशाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र देऊन ही अंमलबजावणी करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात विविध आदेश आणि पत्रांचा संदर्भ देत नगराध्यक्षानी म्हटले आहे की महाराष्ट्र शासन-नगरविकास विभाग,शासन निर्णय दिनांक 17 नोव्हेंबर,2017
मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.महाराष्ट्र शासन-नगरविकास विभाग शासन निर्णय दिनांक 20 नोव्हेंबर,2017अन्वये रुपये 2 कोटी(रिट याचिका क्रमांक 1250/2019) आणि 3 ऑक्टोबर,2018 अन्वये 2 कोटी (रिट याचिका क्रमांक 3682/2019) “वैशिष्ट्यपूर्ण” योजने अंतर्गत निधी वितरीत करण्यासंदर्भात टाकण्यात आलेली आहे.तथापी राजकीय हस्तक्षेपामुळे व प्रभावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतांनाही राज्य शासनाने कार्यान्वयन यंत्रणा नगरपरिषदे ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यात येऊन संदर्भाहींन क्रमांक 1 मधील सुधारित मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यास आला असूनही अनुज्ञेय नसलेली नगरपरिषद क्षेत्राबाहेरील कामांच्या यादीत समावेश असल्यामुळे मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे कडे 2 रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

सबब अमळनेर नगरपरिषदेच्या रीट याचिका 2 आणि 3 अन्वये मा. ना. उच्च न्यायालय , मुंबई खंडपीठ-औरंगाबाद यांचे कडील रिट याचिका 1250 /2019 आणि रिट याचिका 3682/2019 मधील दिनांक 15 मे, 2019 च्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे दिर्घकालीन प्रलंबित प्रस्तावावर ना.उच्च न्यायालय,
मुंबई खंडपीठ, औरंगाबाद यांच्याकडील रिट याचिका 1250/2019 मधील दिनांक 20 ऑगस्ट, 2019 च्या आदेश आणि रिट याचिका 3682/2019 मधील दिनांक 15 मे, 2020 च्या आदेशान्वये 15 ऑगस्ट, 2020 अखेर त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा मा उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग,अमळनेर यांच्या कार्यालयासमोर स्वातंत्रदिनी उपोषण करणार आहे,असा इशारा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा, अमळनेर यांनी दिला आहे.सदर पत्राच्या प्रति सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.