एरंडोल शहरात ५ दिवसांचा जनता कर्फ्यू !

0

एरंडोल (प्रतिनिधी) : नगरपालिकेची दि.६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता एरंडोल नगर पालिका हॉल मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शहरात जनता कर्फ्यु जाहीर करण्याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी,नगराध्यक्ष रामेश परदेशी,तहसीलदार अर्चना खेतमाळीस,पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल उनवणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख,मुख्याधिकारी किरण देशमुख,नगरसेवक नरेंद्र ठाकुर, नितीन महाजन,प्रा.मनोज पाटील,असलम पिंजारी,मोमीन अब्दुल शकुर अ. लतीफ,शहरातील खाजगी डॉक्टर डॉ.राहुल वाघ,डॉ.सुधीर काबरा,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,भाजप ओ. बी.सी.सेल मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी,माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ,डॉ. योगेश सुकटे,डॉ.अजीत भट,विक्रम घुगे,महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी शहरातील कोरोना रुग्णाच्या संख्या १६० असुन ८२ रुग्ण बरे झाले असुन ५ रुग्णांचा मृत्यु झाला असल्याचे सांगुन याठिकाणी उपस्थित सर्व पक्षीय पदाधिकारी व व्यापारी संघटना यांच्या मागणी वरुन सर्व सहमतीने शहरात दि.८ जुलै वार गुरुवार २०२० ते १३ जुलै वार सोमवार पर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यु निश्चित करण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशाने जिल्ह्यात जमाव बंदी कायदा सुरु असुन आपत्ती कायदाही लागु करण्यात आलेला असल्याचे सांगुन नागरिकांनी याची गांभीर्याने नोंद घेण्याची सुचना केली व जनता कर्फ्यु दरम्यान शहरातील दवाखाने,औषध विक्री व कृषी केंद्र सुरु राहतील असे सांगितले.तसेच दुध विक्री करणाऱ्यांनी घरपोच सेवा पुरवावी असेही सांगितले व या व्यतिरिक्त सर्व बंद राहणार असल्याचे सांगितले.तसेच शेवटी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्या व घरीच रहा प्रशासन तुमच्या सोबत असल्याचे देखील आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.