कोरोनापाठोपाठ चीनमध्ये आणखी एका व्हायरस आढळला ; चीनमध्ये अलर्ट जारी

0

नवी दिल्ली :  चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात कहर केलेला असताना चीनमधून आणखी एक व्हायरस आढळून आला आहे. उत्तर चीनच्या एका रुग्णालयात रविवारी ब्यूबानिक प्लेगचा संशयित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.

ब्यूबोनिक प्लेग हा एक जिवाणूजन्य रोग आहे जो मार्मॉट्ससारख्या वन्य उंदरांना होतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, वेळेत उपचार न केल्यास प्लेग २४ तासांपेक्षा कमी वेळात एखाद्याचा जीव घेऊ शकतो. जर एखाद्याला ब्यूबोनिक प्लेगचा त्रास झाला असेल तर, बॅक्टेरियाच्या संपर्कानंतर एक ते सात दिवसांच्या आत फ्लूसारखी लक्षणे दिसू लागतात.ब्यूबोनिक प्लेगच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप आणि उलट्यांचा समावेश आहे.

ब्यूबानिक प्लेगचा संशयित रुग्ण बयन्नुरच्या एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी दाखल झाला. स्थानिक आरोग्य विभागाने हा अलर्ट २०२० अखेरपर्यंत जारी केला आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावेळी शहरात प्लेगसारखी महामारी मानवांमध्ये पसरण्याचा धोका आहे. लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागरुकता आणि क्षमता वाढवणं गरजेचे आहे. तब्येत बिघडली असल्यास तात्काळ त्याची माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणांना द्यावी असं सांगितलं आहे.

ब्यूबोनिक प्लेग काय आहे? तो कसा पसरु शकतो?
ब्यूबोनिक प्लेगला गिल्टीवाला प्लेग म्हणू शकतो ज्यात शरीरात असह्य वेदना, प्रचंड ताप, नाडीमधील गती वाढणे असा त्रास होतो, प्लेग सर्वात आधी उंदरांना होतो, जेव्हा उंदीर मरतो त्यानंतर त्यांच्या शरीरातून जिवंत प्लेगच्या विषाणू बाहेर पडून ते मानवी शरीरात प्रवेश करतात. प्‍लेग रोगाचा प्रसार व उद्रेक मुख्‍यतः उंदीर व त्‍यावरील पिसवांमुळे होतो, हे पिसवे मानवाला चावतात त्यावेळी त्यांच्या शरीरातील संक्रमित द्रव्य मनुष्याच्या शरीरात प्रवेश करुन त्यांना संक्रमित करतात. उंदीर मेल्यानंतर दोन तीन आठवड्यात मानवांमध्ये प्लेगचा प्रसार होतो. दुसऱ्या अहवालानुसारा संक्रमित प्राण्यांचा शिकार आणि खाण्यावर बंदी आणण्यात आली आहे, प्लेगसारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोणत्याही ठोस कारणाशिवाय ताप असल्यासास त्याची नोंद करण्याचं लोकांना सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.