बाम्हणे रस्त्यावरील मोरीचा पहिल्या पुरातच भरावा वाहील्याने वाहतुकीची कोंडी

0

निपाणे, ता. एरंडोल (वार्ताहर) : बाम्हणे / निपाणे रस्त्यावर गेल्या ३ – ४ महिन्यांपूर्वी ‌ सिकंदर पिरण पिंजारी यांच्या शेताजवळ  कॉर्नरवर ठेकेदाराकडून मोरी बांधण्यात आली आहे. आजू बाजूला दगडाच्या भिंती उभ्या करून मध्यभागी नाल्याचे पाणि निघावे यासाठी कमकुवत पाईप टाकून मुरुम मातीचा भरावा करण्यात आला होता.

परंतु दि, १ जुलै रोजी निपाणे येथे झालेल्या दमदार पावसात पहिल्याच पुरात ह्या मोरीचा भरावा वाहून गेल्याने रस्त्याच्या कॉर्नरवर भले मोठे भगदाड पडले आहे. रात्री च्या वेळी दमदार पाऊस झाल्यास कमकुवत पाईपातून पुराचे
पाणि निघणार नसल्याने सदर पाणी रस्त्यावरुन वाहणार आहे. तेव्हा पडलेल्या भगदाडामध्ये एखादे वाहन पडून धोका निर्माण होण्याचा संभव नाकारता येत नाही त्यामुळे सदर मोरी वरील पुरात वाहून गेलेला भरावा आजच  दगड मुरुम  माती टाकून करणे गरजेचे झाले आहे. तरी या मोरीच्या समस्येकडे संबधीतांनी जातीने लक्ष घालून पडलेले भगदाड त्वरीत बुजवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय माधवराव पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.