उत्तर प्रदेशात फॅक्‍टरीत स्फोट ; ७ ठार, ४ जखमी

0

गाझियाबाद – उत्तर प्रदेशातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 7 जण ठार झाले तर अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. गाझियाबादेतील मोदी नगर भागात ही घटना घडली, असे जिल्हा दंडाधिकारी अजय शंकर पांडे यांनी सांगितले.

या फॅक्‍टरीमध्ये पार्टीसाठीच्या आतषबाजीच्या फटाके केले जात होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार या फॅक्‍टरीच्या मालकाचा शोध घेतला जात असून या फॅक्‍टरीमध्ये कोणत्या स्फोटकांचा वापर केला जात होता, याचीही माहिती घेतली जात आहे, असे ग्रामीण पोलीस अधिक्षक नीरज कुमार जदाऊं यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्‍त केले आहे आणि घटनास्थळाला भेट देण्याची सूचना जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना केली आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.