यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील स्ट्रीटलाईट सुरू करावे

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरातील यावल नाका ते लाईफ केअर हॉस्पिटल या परिसरातील सेंट्रल पोलवरील स्ट्रीटलाईट सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक तथा विद्यार्धी परिषदेचे उप जिल्हा प्रमुख दिपक काशिनाथ धांडे यांनी केली असून संदर्भात भुसावळ पालिकेचे मुख्य कार्यकारी अभियंता, (इलेक्ट्रिक विभाग) यांना शनिवार ४ जुलै रोजी देण्यात आले आहे.

भुसावळ शहरातील यावल नाका ते लाईफ केयर हॉस्पिटल या भागातील सेंट्रल पोल वरील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे त्या मुळे या भागातील रहिवाशांमध्ये भीती चे साम्राज्य पसरलेले आहे आणि त्यामुळे ह्या भागात चोऱ्यां होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
तसेच ह्या भागातील बहुतेक नागरिक रेल्वे व भुसावळ व वरणगाव फॅक्टरी येथे नौकरी वर असल्या कारणाने रात्री ४/१२ ड्यूटी करून व रात्री १२/८ या वेळेवर ड्यूटी वर जाणाऱ्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री अंधार असल्या कारणाने मोकाट कुत्र्यांचा सुध्दा सामना करावा लागतो व त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांचा अपघात सुध्दा झालेलाआहे
तसेच सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व इतर महिला पुरुष यांना सुध्दा ह्या अंधारामुळे भीती वाटते व आधाराचा फायदा घेऊन महिलांचे मंगळसूत्र व चैन लुटण्याचे प्रकार ही होऊ शकतात ह्या भीती पोटी अनेक महिला पुरुषांनी सकाळी व सायंकाळी फिरायला जायचं बंद केलेले आहे आणि त्यामुळे त्यांना शरीरातील बऱ्याच व्याधींना सामोरे जावे लागते.
त्यामुळे आपण या परिसरातील सेंट्रल पोलवरील स्ट्रीटलाईट येत्या ८ दिवसामध्ये सुरू करावे अन्यथा परिसरातील नागरिकांना घेऊन सेंट्रल पोल वर शिवसैनिक व परिसरातील नागरिक भुसावळ नगर पालिका चे लक्ष वेधण्यासाठी सेंटर पोल वर कंदील लाऊन भुसावळ नगर पालिकेचा निषेध करतील असा इशारा माजी नगरसेवक दिपक धांडे, देवेंद्र पाटील, नरेंद्र लोखंडे, सागर वाघोदे, हेमंत ब-हाटे, राकेश खरारे, जितू पाटील, प्रमोद राऊळ, सतीश फेगडे, यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.