चाळीसगाव येथीलभगवती विहार मधील नागरिकांनी आमदाराकडे दिले समस्यांचे निवेदन 

0

आमदार मंगेश चव्हाण यांनी समस्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन दिले

चाळीसगांव (प्रतिनिधी) : येथील भगवती विहार शहरातील मध्यभागी असणारा रहिवाशी भाग आहे. या भगवती विहार मध्ये पहिल्याच पावसात आपण शहरात राहतो की ग्रामीण भागात राहतो याचा अनुभव आला.
नागरिकांनी नगरसेवक व नगरपालिका येथे आपले गाऱ्हाणे मांडले मात्र तेथे त्यांना सर्व सामान्य नागरिकांप्रमाणेच खाली हात परत यावे लागले. नित्याच्या समस्यांनी त्यांना शांत बसू दिले नाही. त्यांनी तात्काळ आमदार मंगेश चव्हाण यांना संपर्क करून भेट घेतली. त्यांच्या भेटीत आमदारांनी सर्व समस्या समजून घेतल्यात. तात्काळ नगरपालिका व नगरसेवक याना फोन वरून समस्या सांगितल्यात आणि लवकरच चिखल युक्त रस्ता चांगला करण्यात येईल याचे आश्वासन दिले.

यावेळी भगवती विहार मधील नागरिक सौ पूजा लददे यांनी रस्त्याच्या समस्यां सांगितल्या. महिलांना व नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो. याची माहिती दिली. कुणाची गाडी चिखलात फसते तर रिक्षा वाले यायला तयार होत नाहीत त्यामुळे वयस्कर व्यक्तींना डॉकटर कडे न्यायला त्रास होतो. दूध वाला , भाजी विक्रेते, डॉक्टर कोणीही पाऊस पडल्या नंतर यायला तयार होत नाहीत. रस्त्यामुळे अनेक बेसिक गोष्टीसाठी सामना करावा लागतो.तर हे बंद होण्यासाठी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा या संदर्भात भगवती विहारचे जेष्ठ नागरिक रत्नाबाई सोनार अध्यक्ष डॉ संतोष मालपुरे, सचिव हेमंत शिरुडे , उपाध्यक्ष कृष्णराव सोनवणे, कार्यध्यक्ष निरंजन लददे, प्रदीप सोनगीरे , अनिल पाटील, सौ मनीषा शिरुडे , सौ शीतल चौधरी , जगदीश सोनार,उमेश अमृतकर आदींनी भगवती विहार च्या समस्या माडल्यात.

समस्या जर मार्गी लागल्या नाहीत तर या वर्षा पासून नगरपालिकेला कुठलाही कर भरला जाणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावर आमदार चव्हाण यांनी लवकरच रस्ता व भगवती विहारच्या विकास कामासाठी मला शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर लवकरच आमदार श्री चव्हाण, नगरपालिका अधिकारी यांच्या सह भगवती विहारला भेट देणार आहेत. त्याच ठिकाणी प्रत्येक्ष अडचणी पाहून समस्या सोडवल्या जातील याची हमी दिली.

यावेळी राजेंद्र येवले, प्रदीप सोनवणे, शार्दूल, जितेंद्र चितोडकर, श्री कोठावदे सर, मोहन सोनार , श्रीमती निकम , बाळकृष्ण अमृतकर , एस के चौधरी आदी नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.