चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे उद्यापासुन राजव्यापी आंदोलन

0

पाचोरा (प्रतिनिधी) : आरोग्य सेवा व वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या अधिनस्त असलेल्या राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व रुग्णालयातील चतुर्थश्रेणीतील पदांची भरती सरळसेवेने तात्काळ करावी. या मागणीसाठी राज्य सरकारी गट – “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना दि. ३० जुन पासुन राज्यव्यापी आंदोलन करत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली आहे.

आरोग्य सेवा व वैद्यकिय शिक्षण व संशोधन यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालतील गट – “क” आणि “ड” वर्ग श्रेणीतील पदे सरळसेवेतुन भरण्याबाबत मान्यता दिली आहे. यात “ड” वर्ग श्रेणीचे बहुउद्देशिय पदे बाह्य यंत्रणेकडून भरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सरकार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसमवेत दुजाभाव करत असून चतुर्थश्रेणीतील कर्मचारी शासनाचे आधारस्तंभ असतांनाही पदे न भरता बाह्य यंत्रणेकडून मनुष्यबळ उपलब्ध करून देणे. हा वंचित समुदायावर अन्याय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

सरकारच्या या निर्णयाला विरोध आणि सरळ सेवा भरतीच्या मागणीसाठी राज्यभर दि. ३० पासुन आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि संचालक यांना या आंदोलनाची निवेदनाद्वारे पूर्व कल्पना देऊनही चर्चेसाठी न बोलाविल्याने मंगळवार दि. ३० जुन पासुन राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी काळ्या फिती लावुन काम तसेच जेवणाच्या सुट्टीत एक तास निदर्शने राज्यभर करणार आहे. ३ ते ५ जुलै दररोज दोन तास काम बंद आंदोलन तर ७ जुलैला संपुर्ण दिवस काम बंद आंदोलन होईल. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या भावना अतिशय ती्व्र आहेत. म्हणुनच राज्यव्यापी आंदोलन होत असल्याची माहिती भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकु साळंखे, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, सरचिटणीस प्रकाश बने, सहसचिव वरेश कमाने, बाबा कदम यांनी दिली.

सरकारला आंदोलनाची पुर्व कल्पना देऊनही चर्चेसाठी न बोलविल्याने येत्या मंगळवार दि. ३० जुन पासून राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी राज्यव्यापी आंदोलन करत आहे.
– भाऊसाहेब पठाण
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

Leave A Reply

Your email address will not be published.