आता बोदवड ग्रामीण रुग्णालयातील बंद असलेली रुग्ण वाहिका सुरु होण्याची प्रतिक्षा

0

बोदवड (प्रतिनीधी) : शहर तथा तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार व तालुक्यात वाढत असलेली बाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून येथील ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याने हि समस्या तात्पुरती मिटली आहे.मात्र आता येथील गेल्या १३ दिवसांपासून बंद असलेली (१०२) रुग्ण वाहिका सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.

ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवेसाठी तसेच गरोदर महिलांसाठी मोफत असलेली (१०२) रुग्ण वाहिका गेल्या १३ दिवसांपासून बंद असल्याने येथे येणा-या गोरगरिब व सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्ण वाहिका परवडत नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपुर्वी येथे एका गरोदर महिलेला १०२ रुग्ण वाहिका नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागला.
पर्यायी व्यवस्था म्हणून एणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्ण वाहिकेचा अतिआवश्यक सेवेसाठी वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.मात्र दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची गरज निर्माण झाल्यास रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण होवू शकते.
येथील रुग्णालयात असलेली (१०२) रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.तालुक्यात करोना बाधितांची वाढती संख्या पाहता तसेचं अत्यावश्यक सेवेसाठी व गरोदर महिलांसाठी हि रुग्ण वाहिका उपलब्ध असणं अति आवश्यक आहे.येथील रुग्णालयात (१०२) रुग्ण वाहिकेची अत्यंत आवश्यकता असून ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी याबाबत आपण वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचे येथील डॉ.उदयकुमार पाटील यांनी लोकशाही शी बोलताना सांगितले.

तरी वरिष्ठांनी हि अति आवश्यक असलेली रुग्ण वाहिका तात्काळ उपलब्ध करून द्यावी अथवा जो पर्यंत ही रुग्ण वाहिका नादुरुस्त आहे तो पर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी (१०२) रुग्ण वाहिका उपलब्ध करून द्यावी अशी रास्त मागणी तालुक्यातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.