पारोळ्यात नव्या नियमानुसार उघडण्यात येतील उद्यापासून दुकाने ! 

1

पारोळा (प्रतिनिधी) : शहरात कोरोना कोव्हीड १९च्या वाढत्या पार्श्वभूमीवर शहरात सात दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला असून त्याची मुद्दत उद्या गुरूवारी संपणार आहे. उद्या गुरुवार दिनांक पासून संपूर्ण बाजारपेठ नविन नियमांचे पालन करीत सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहाणार असुन यात काही नविन नियमांचे पालन करावे लागणार आहेत. जसे की सोशल डिस्टन्स, प्रत्येकाने माॅस्क वापरने , येणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांना सॅनिटाइज करने, तसेच सर्व व्यापाऱ्यांनी घरून पायी येणे कोणीही मोटारसायकल चा बाजारपेठेत वापर न करने, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांनी बाजारपेठेच्या बाहेर वाहन लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यात अमळनेरकडील भागासाठी च्या ग्राहकांसाठी बालाजी पार्कवर, तर धुळेरोड कडील ग्राहकांसाठी मराठी शाळेच्या मैदानावर, तर कजगाव कडील ग्राहकांसाठी अॅग्रेंतलाव मैदानावर, व्यवस्था करण्यात आली आहे.

पारोळा बाजारपेठेत कोणत्याही दुचाकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. याची कडेकोट अमलबजावणी करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी प्रशासन सहकार्य करावे असे आवाहन पारोळा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जर कोणी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

1 Comment
  1. Nitin inait says

Your email address will not be published.