भुसावळात अवैध दारू विक्रेत्यांवर बाजारपेठ पोलीस स्टेशनची कारवाई ; ५१ हजाराचा माल जप्त

0

भुसावळ |  प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनी भागात गैर कायदेशीर परवाना दारूची चोरटी विक्री करणाऱ्यास बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले.      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  संचारबंदी असल्याने मद्याची सर्व दुकाने बंद आहेत . याचा  फायदा संशयीत आरोपी मनिष मोहनलाल गोगीया वय ४० , राहणार छोटे सेवा मंडळ, सिंधी कॉलनी, भुसावळ याने घेवून बेकायदेशीररीत्या चोरटी दारू विक्री करीत होता .

ही माहिती मिळाल्यावरुन बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचेसह सपोनि अनिल मोरे, पोना.रमण सुरळकर,पोना उमाकांत पाटील,पो कॉ प्रशांत परदेशी,मपोकॉ. वैशाली सोनवणे

यांनी अवैध दारू विक्रेत्यांस छापा टाकून रंगेहात पकडले यावेळी संशयीत आरोपी मनिष मोहनलाल गोगीया हा

एम.एच.१९ डी. एन.५२५७ क्रमांकाची बजाज प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल सह बियरच्या ७ बाटल्या व २ टिन असे एकूण ५१ हजार ३८० रुपये किमंतीचा मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेण्यात आले . आहे.

याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादीे पोना रविंद्र बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  गुरन ३५/२०२० मुंबई दारू बंदी कायदा कलम ६५, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.