INDvSA 1st ODI : .तर 20-20 षटकांचा सामना होणार

0

धर्मशाळा – भारत विरूध्द दक्षिणआफ्रिका दरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. दुपारी 1.30 वाजता सुरू होणारा सामना अद्यापही सुरू झालेला नाही.

प्रथम खेळपट्टी ओली असल्याने नाणेफेकीला उशीर होणार आणि 1.15 वाजता खेळपट्टीची पाहणी होणार असे बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सांगितले होते. पण त्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. तो अद्याप थांबलेलाच नाही. त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही.

त्यानंतर बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून सामन्याविषयी माहिती दिली आहे. जर 6.30 च्या आधी पाऊस थांबला आणि पोषक वातवरण निर्माण झाले तर प्रत्येकी 20-20 षटकांचा सामना खेळता येऊ शकतो अन्यथा सामना रद्द होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.