शिवणी ,आमङदे व वडजी येथे गावठी हातभटटींवर पोलीसांची धाङ . २ जणांविरुद्ध कार्यवाही

0

भडगाव, दि. २९ –

तालुक्यातील शिवणी ,आमङदे व वडजी येथील शेतशिवारात गावठी हाथ भटटींवर भङगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या पथकाने धाङ टाकुन दोघ कार्यवाहीत एकुण ७० हजार रुपये किमतीचे रसायन व साहीत्यासह हातभटया फोङुन उध्वस्त केल्याची कार्यवाही केली.हया तिन्ही घटना दि. २८ रोजी घङल्या. भङगाव पोलीस स्टेशनला २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहीती अशी की, भङगाव तालुक्यातील शिवणी गावाच्या धरणाजवळ महादु भिल्ल रा. खेङगाव खु ता. भङगाव हे दि. २८ रोजी सकाळी ९ वाजता कच्चे पक्के रसायन जवळ बाळगुन दारुची भटटी रचुन गावठी हातभटटीची दारु तयार करीत होते. पोलीस समोर आल्याची चाहुल लागताच तेथुन पळुन गेला. पोलीसांना २८ हजार रुपये कीमतीचे कच्चे पक्के रसायन व ईतर साहीत्य मिळुन आले. पोलीसांनी रसायनासह हातभटटी फोङुन उध्वस्त केल्या. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, पो.हे.काॅ राजेंद्र साळुंखे, पो. ना. नितीन सोनवणे, पो. काॅ. एकनाथ पाटील, पो. काॅ. हरीष अहीरे , पो ,काॅ विजय पाटील, या पोलीसांच्या पथकाने ही कार्यवाही केली. याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला पो. काॅ. हरीष अहीरे भङगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महादु भिल्ल रां खेङगाव खु ता. भङगाव यांचे विरोधात भाग ६ गु. र. न.६०४३/१८ मुंबई दारू अधिनियम ६५ फ, ६५ ब,६५ क,६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकाॅ . राजेंद्र सोनवणे हे करीत आहेत.

तसेच आमङदे येथेही पोलीसांनी गावठी हातभटटीवर धाङ टाकुन एका जणाविरुध्द कार्यवाही केली आहे. आमङदे शिवारातील पाटाच्या चारीलगतच सुनिल भिल्ल हे दि. २८ रोजी सकाळी ९.३० वाजता कच्चे पक्के रसायन जवळ बाळगुन दारुची भटटी रचुन गावठी हातभटटीची दारु तयार करीत होते. पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन गेला. पोलीसांना ४२ हजार रुपये कीमतीचे कच्चे पक्के रसायन व इतर साहीत्य मिळुन आले. पोलीसांनी तेथेही रसायनासह हातभटटी फोङुन उध्वस्त केली. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाही सहाय्यक फौजदार भास्कर बङगुजर, पो.हे.काॅ. कीरण ब्राम्हणे, पो.काॅ. मंगलसिंग गायकवाङ, पो. ना. राजु सोनवणे, पो. काॅ. भावराव पाटील या पोलीसांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे. याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला पो. काॅ. भावराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुनिल भिल्ल रा. आमङदे. ता. भङगाव यांचे विरुद्ध भाग ६ गु. र. न.६०४४/१८ मुंबई दारू अधिनियम ६५ फ, ६५ ब,६५ क ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार भास्कर बङगुजर हे करीत आहेत. तसेच वडजी शिवारात मेलन नाल्याजवल गावठी दारुभट्टी उध्वस्त करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वेळी पो. हे. काॅ, दिलीप पाटील, पो, ना, भगवान चौधरी, पो, ना, भगवान बडगुजर, भावराव पाटील आदी कार्यवाही वेळी उपस्थित होते या कार्यवाहीने मोठी धास्ती पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.