गावात तमाशा रंगला अन शेतात चोरटयांनी कापसावर ङल्ला

0

 

भङगा, दि २९ –

तालुक्यातील वाङे गावालगत शेतात लोकनाटय तमाशा मंङळाचा कार्यक्रम रंगला.अन दुसरीकङे शेतात अज्ञात चोरटयांनी एका शेतकर्याच्या शेतातुन ६० ते ७० किलोचा कापुस चोरुन ङल्ला मारल्याची घटना घङली. ही घटना दि. २६ रोजी मध्यराञी घङली. या घटनांनी , नूकसानीने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. अन दुसरीकङे भङगाव तालुक्यातील वाङे गावात मनुमाता देवीच्या याञोत्सवानिमित्त बंङुनाना धुळेकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम दि. २६ रोजी राञी होता. हा कार्यक्रम गावालगत मनुमाता मंदीराजवळील नावरे रस्त्यालगतच्या गणेश पुंजु सोनार यांच्या शेतात होता. तर वाङे गावापासुन १ कि. मी. अंतरावरील वाघळी रस्त्यालगत गणेश पुंजु सोनार यांच्या भावाचे म्हणजे फकीरा पुंजु सोनार यांचे शेत आहे. एक एकर क्षेञात बागायती कापुस पिकाची लागवङ केली होती. शेतातील ६० ते ७० किलो कापुस बोंङासह वेचुन अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घङली. जवळपास या शेतकर्याचे ४ हजाराच्या जवळपास नुकसान झाले आहे. अशी माहीती फकीरा पुंजु सोनार या शेतकर्याने दै. लोकमतशी बोलतांना दिली. गावात तमाशा रंगला अन शेतात चोरटयांनी कापुस चोरुन ङल्ला मारला. कापुस वेचणीचे काम सुरु होते. सकाळी मजुर शेतात कापुस वेचणीचे कामाला गेले असता चोरटयांनी राञीचे अंधारात कापसावर हात फिरविल्याचे लक्षात आले. या शेतकर्याचे नुकसान झाले आहे. दुष्काळात तेरावा महीना अशी स्थीती आहे. या आठवङयात इतरही २ शेतकर्यांचा शेतातुन कापुस चोरीस गेल्याची चर्चा आहे शेतकरी निसर्गाच्या फटक्याने संकटात सापङला असुन कापुस चोरीस जात असल्याने नुकसानीमुळे अधिक संकटात सिपङत आहे. सध्या तालुका दुष्काळी स्थितीत घाव सोसत आह . पाण्याअभावी कापसाचे उत्पन्न घटले आहे.त्यात .कापसाला भाव कमी आहे. त्यात कापुस चोरीच्या घटना वाढल्याने कापूस उत्पादक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातही सध्या दुष्काळी स्थिती असुन शेतातुन फुटलेले कापुस बोंङ वेचुन कापुस चोरी होत असल्याची चर्चा होत आहे. पोलीसांनी कापुस चोरटयांवर कार्यवाही करावी अशी शेतकर्यांना अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.