23 एप्रिल रोजी मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहिर

0

जळगाव :- सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान जळगाव आणि रावेर मतदार संघामधील मतदारांना दि 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान करता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
03-जळगाव व 04- रावेर मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागु राहील. तसेच सदर सुट्टी राज्य शासन व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठाण यांना ही लागू राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.