एरंडोल येथे आज इंग्लिश फेअर कार्यक्रम

0

एरंडोल (प्रतिनिधी) : प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक  यांच्यामार्फत इंग्लिश फेअर प्रोजेक्ट पायलट बेसिसवर एरंडोल व चाळीसगाव या दोन तालुक्यांमध्ये राबविला जात असून इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल तालुका स्तरीय इंग्लिश फेअर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 22/2/2020 रोजी तळई माध्यमिक विद्यालय तळई येथे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमांमध्ये एरंडोल तालुक्यातून एकूण 250 विद्यार्थी आपल्या इंग्रजी भाषेच्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. तसेच एरंडोल तालुका व  संपूर्ण जिल्ह्यातील एकुण 75 इंग्रजी भाषा  शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमास  या कार्यक्रमाच्या प्रमुख डॉक्टर संगीता महाजन व प्राधिकरणातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात प्राधिकरणामार्फत प्रथमच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून शनिवारी प्रत्येक शाळेत पार पडणाऱ्या इंग्लिश डे चे मूल्यनिर्धारण होणार असल्याचे या कार्यक्रमाचे समन्वयक व प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे इंग्रजी विषय सहाय्यक भरत शिरसाठ यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.