18 मेला भडगावात जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग

0

भडगाव | प्रतिनिधी
     भडगाव येथील केशवसुत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दरमहा एक व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. याच मालिकेत मे महिन्यात पुणे येथील सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खास उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त विद्यार्थी, बालगोपाल तसेच पालकांच्या मनोरंजनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाचे तीन तुकडे करणे, मुलगा हवेत उडविणे, कबुतर निर्मिती व गायब करणे, पैशांचा पाऊस, एका मोठ्या फासाचे चार पिंजर्यात रूपांतर, माणसाचा हात कापणे, डोळ्याच्या शक्तीने ग्लास फोडणे व लाकडी फ्रेममधून पलायन करणे असे अनेक जादूचे प्रयोग ते करून दाखवणार आहेत. डाॅ. शांतीलालजी तोतला व विलासराव नेरकर हे संयुक्त प्रायोजक आहेत. दि.18 मे, शनिवारी सायंकाळी 8 वाजता शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणावर आयोजित या कार्यक्रमास उपस्थिती देण्याचे आवाहन केशवसुत ज्ञानप्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.