पोलीस अधिकारी अंमलदारांच्या १० वी उत्तीर्ण पाल्यांचा पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांच्या हस्ते सत्कार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च -२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल दिनांक २७.०५.२०२४ रोजी घोषित करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांचे संकल्पनेतुन जळगांव जिल्हा पोलीस दलात प्रथमच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या ज्या पाल्यांना ८०% च्या वर गुण मिळवुन विशेष प्राविण्यासह उर्तीण होवून यश संपादन केले आहे, अश्या पाल्यांचा दिनांक २९.०५.२०२४ रोजी सांयकाळी ५ वाजता पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रमोद पवार पोलीस उप अधीक्षक गृह यांचे हस्ते एकुण ४२ पाल्यांना प्रशंसापत्र व बक्षिस देवून गौरवण्यात आले.
त्यात विशेषतःहा कु. सुष्टी ज्ञानेश्वर बागूल हिने ९८.४० % गुण मिळवून उत्तीर्ण होवून जळगांव शहरात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सदर कार्यक्रमावेळी पो.नि दिपक बुधवंत, मानव संसाधन विभाग व रा.पो.नि संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आयोजन पो.उ.नि श्रीमती रेश्मा अवतारे (मानव संसाधन विभाग) यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.