४ मे पासून लागू होणार नव्या गाइडलाइन्स

0
नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण होईल. दरम्यान, लॉकडाउन संदर्भात ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली, तसंच ४ मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार असून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.