१०० तास स्वच्छतेसाठी उपक्रमात ५ हजार विद्यार्थी नोंदणीचे उद्दिष्ट्य

0

जळगाव;- `स्वच्छ भारत – उन्हाळी प्रशिक्षण : 100 तास स्वच्छतेसाठी ` या अभिनव उपक्रमामध्ये उमवि परिक्षेत्रातील पाच हजार पेक्षा अधिक विद्याथ्र्यांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बौठकीत निर्धारीत करण्यात आले. पुढील शौक्षणिक वर्षापासून या उपक्रमाचा चॉईस बेस क्रेडीट कोर्स अंतर्गत समावेश करण्याचा तसेच या वर्षी या उपक्रमात सहभागी होणाज्या अंतिम वर्षातील विद्याथ्र्यांना अतिरिक्त गुण देण्याची घोषणा कुलगुरूंनी यावेळी केली.

मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच पाणी व स्वच्छता मंत्रालय यांच्या सहयोगाने स्वच्छता उपक्रम सामुहिक चळवळ होण्याच्या उद्देशाने `स्वच्छ भारत – उन्हाळी प्रशिक्षण : 100 तास स्वच्छतेसाठी` या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिक्षेत्रात हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दिनांक 17 मे रोजी प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकम अधिकारी, विद्यार्थी विकास अधिकारी व एन.सी.सीचे कमांडींग अधिकारी यांची बौठक झाली. या बौठकीस व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी, प्रभारी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.एस.टी.इंगळे हे मंचावर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी नावनोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली असून पोर्टलवर 15 जून पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती प्रा.इंगळे यांनी प्रास्ताविकात केली. ग्रामीण भागात जनजागृती व्हावी आणि स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने पथनाट¶, रॅली, घनकचरा व्यवस्थापन असे अनेक उपक्रम राबविता येतील असेही ते म्हणाले. दिलीप पाटील यांनी तरूण पिढील श्रमसंस्कृतीसोबत जोडण्यासाठी हा उपक्रम असून गावाची गरज ओळखून त्या पध्दतीची कामे गावात केली जावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विविध कार्यक्रम अधिकारी यांनी काही सूचना मांडल्या.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरुंनी हा उपक्रम अभिनव असा असून स्वयंस्फुर्तीने त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या उपक्रमात दोन पाऊले पुढे टाकले असून हा उपक्रम चॉईस बेस क्रेडीट कोर्सशी पुढील शौक्षणिक वर्षापासून जोडला जाईल. यावर्षी या उपक्रमात अंतिम वर्षातील जे विद्यार्थी सहभागी होणार आहेत व त्यांचा निकाल जाहीर झाला तरी त्यांना अतिरिक्त 20 गुण दिले जाणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली. स्वच्छतेचे महत्व सांगताना या वर्षीच्या वर्धापन दिनापासून ग्रामीण भागातील एक आणि शहरी भागातील एक अशा दोन महाविद्यालयांना स्वच्छ आणि सुंदर महाविद्यालय असे पारितोषिक दिले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. 2 ऑक्टोबर पासून आठवडाभर विद्यापीठातील सर्व शौक्षणिक व प्रशासकीय विभाग तसेच सर्व महाविद्यालये यामध्येही साफसफाईचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा.मनोज पाटील यांनी पोर्टलवर नावनोंदणी करण्याच्या प्रक्रियेविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दीपक सोनवणे यांनी केले. प्रा.मनोज पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.