हुश्श ! पहूर येथील’ त्या ‘तरुणाचा अहवाल निगेटिव्ह !

0

पहूर, ता.जामनेर (प्रतिनीधी) : जळगावच्या कोवीड रुग्णालयात मृत्यू झालेल्या पहूरच्या ‘त्या ‘ तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली. श्वासाच्या त्रासामुळे पहूर कसबे येथील 38 वर्षीय तरुणाचा जळगाव येथील जिल्हा कोवीड रुग्णालयात 13 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला असून जामनेर तालुका अजूनही कोरोना मुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही जनतेने काळजी घेण्याची गरज आहे.

तर जीव वाचू शकला असता

पोटदूखीमुळे त्या तरूणाने गावातच खासगी दवाखान्यात दोन दिवस उपचार घेतले.नंतर श्वासाचा त्रास सुरू झाल्यावर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जळगांवला नेण्याचा सल्ला दिला.जळगावं येथे गोदावरी हॉस्पीटलमध्ये नेल्यावर आमच्याकडे ‘ व्हेंटीलेटर ‘ची सुविधा नसल्याचे सांगून कोवीड रुग्णालयात दाखल करा , असे गोदावरी फाऊंडेशन प्रशासनाने सांगीतले , नंतर कोवीड रुग्णालयात ‘ त्या ‘ त्या तरूणास दाखल केल्या गेले मात्र उशीर फार झाल्यामुळे उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

पहूरचे उपजिल्हा रुग्णालय कागदावरच !

पहूर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होवून दिड वर्ष उलटले आहे . मात्र येथे अजूनही फारश्या सुविधा नाहीत . आरोग्य प्रशासनाने पहूरला मुलभूत वैदयकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.