हुतात्मा जवान निलेश सोनवणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव  शहरातील टोणगाव भागातील रहिवासी निलेश रामभाऊ सोनवणे या हुतात्मा जवानांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिद जवान निलेश रामभाऊ सोनवणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात गिरणा नदी पात्रात शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले. शहिद जवान निलेश सोनवणे अखेरचा निरोपाच्या वेळी भडगाव तालुका परीसरातील तरुण, रजेवर घरी आलेले सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, शहरातील नागरीक, महिला वर्ग, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलेश सोनवणे  या जवानाला  लेह-लडाख येथे कर्तव्यावर असतांना वीरमरण आले होते.  त्यांचे पार्थीव सोमवारी सकाळी येथे लष्कराचे अधिकारी आणि जवानांनी आणले होते.  त्यांच्या अंत्यविधीला पंचक्रोशीतील जनसागर उसळला होता.   टोणगाव भागातील रहीवाशी निलेश रामभाऊ सोनवणे (वय ३०) या जवानाचे कर्तव्यावर असतांना लेह-लडाख मधे निधन झाले होते . जवान निलेश सोनवणे या जवानाचे निधन झाल्याचे वृत्त भडगाव येथे धडकताच  सोनवणे परीवारसह परीसरात, तालुक्यात शोककळा पसरली.

निलेश सोनवणे या भारतीय सैन्यात महार रेजिमंट मध्ये कार्यरत होते . या जवानाचे पार्थिव लेह येथून विमानाने दिल्ली येथे आणले  गेले  तेथून नाशिक येथे नाशिकहून  वाहनाने भडगावला आणले गेले.  त्यांच्या पश्चात आई व पाच भाऊ असा परिवार आहे. दोन मोठे बंधू बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस सेवेत कर्तव्यावर आहेत.  तीन भाऊ गावात पेंटिंग व्यवसाय करतात.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.