हुडकोची 253 कोटीत राज्यशासनाकडून सेटलमेंट- आ. भोळे

0

जळगाव- महानगरपालिकेच्या हुडको कर्जप्रकरणी राज्यशासनाने त्या कर्ज भरण्याचे मान्य केले होते. त्याप्रकरणी राज्य शासनाकडून मनपाच्या कर्जापोटी राज्य शासनाने 253 कोटी रुपये भरावे, असे हुडको या वित्तीय संस्थेने मान्य केले असल्याची माहिती आ. राजुमामा भोळे यांनी बुधवारी संध्याकाळी दिली. ही रक्कम पुर्ण राज्य शासन भरणार असून ठरल्याप्रमाणे निम्मी रक्कम मनपाला 3 कोटीच्या मासिक हप्त्यात भरावयाची आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी देण्याचे कबुल केले असल्याने मनपा कर्जमुक्त होणार असल्याचे ते म्हणाले.

गाळेधारक पैसे भरतील
मागील बिले जास्त आकारण्यात आली होती. ती बिले आता कमी झाली आहेत. गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न करु. निश्चितच गाळेधारक पैसे भरतील व त्या पैशातून उर्वरित देणी देणार असल्याचे ते म्हणाले.

पिंप्राळ्यात पुर्णाकृती दिक्षाभूमि साकारणार
पिंप्राळा येथील घरकुल वार्ड नं. 10 मध्ये पुर्णाकृती दिक्षाभूमि साकारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या निधीला दलीत निधीतून बौद्ध विहार बांधण्यास परवानगी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.