हिवाळ्यात वाटण्यांची कचोरी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घ्या

0

मटार अर्थात वाटण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. वाटाणे हे पनीर, पुलवा, पावभाजी, मसाली भात-खिचडी, अशा विविधसाठी उपयोग केले जातात. दरम्यान, तुम्ही कधी मटार वाटण्याची कचोरी खाल्ली आहे का हो? नाही? तर मग तुम्ही एकदा तरी नक्कीच हि डिश ट्राय करायला हवी. आपल्या महाराष्ट्रात हा पदार्थ फार बनवला जात नाही. उत्तर भारतात मात्र हा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. खासकरून राजस्थान, दिल्ली या भागात मटर कचोरी सर्वाधिक प्रमाणात खाल्ली जाते.

तुम्हाला वाटत असले की केवळ टेस्टला हा पदार्थ चांगला म्हणून प्रसिद्ध असले तर असे नाही, उलट या पदार्थाचे फायदे सुद्धा आहेत. म्हणूनच हा पदार्थ प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल कचोरीचे फायदे? ते सुद्धा आरोग्यासाठी? तर हो मंडळी या मटर कचोरीचे आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत, खास करून थंडीच्या वातावरणामध्ये. चला तर आज या लेखातून आपण मटर कचोरी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

अनेकांना हि गोष्ट माहित नाही पण वाटाणे हे नैसर्गिकरीत्या कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करतात. म्हणून थंडीच्या दिवसांत दर दिवशी वाटाण्याचे सेवन हे करायलाच हवे आणि हे सेवन करणे सोप्पे सुद्धा आहे कारण वाटाण्याचे कोणतेही पदार्थ बनवणे अतिशय सोप्पे आहे. भाजी, उसळ तुम्ही काहीही बनवू शकता आणि त्याचे सेवन करू शकता. कचोरी कोणतीही असो वाटाण्याची किंवा अन्य कसलीही, ती तयार करण्यासाठी कचोरी डीप फ्राय करावी लागते. यामुळे त्यात फॅटची मात्र वाढू शकते. परंतु जर फ्राय करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर केला तर मात्र ती मात्र वाढणार नाही.

वाटाण्यामध्ये कॅलरी अतिशय कमी असते. जर वाटाण्याची कचोरी बनवण्यासाठी तुम्ही मल्टी ग्रेन आटा किंवा डायबेटीक आटाचा वापर केला तर त्या माध्यमातून शरीरात जास्त मेद जमा होणार नाही आणि तुम्ही मनसोक्तपणे कचोरीचा आनंद घेऊ शकता. वाटाण्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. या कारणामुळे पोट लवकर भरते आणि जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही. म्हणूनच वाटाण्याचे सेवन केल्याने भूक लगेच शांत होते. याचा परिणाम असा होतो की कमी अन्न खाल्ल्याने अधिक कॅलरी सुद्धा शरीरात जमा होत नाही. यामुळे वाढते वजन नियंत्रित होते आणि वाढले वजन कमी होण्यास सुद्धा मदत मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.