हिवरी शिवारात पाच शेतकऱ्यांच्या केबल वायरी चोरीस

0

पहूर ता. जामनेर : येथून जवळच असलेल्या हिवरी शिवारातील पाच शेतकऱ्यांच्या शेतातील बोअरवेल मधील तांब्याची तार असलेली केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरी अोंकार पाटील, सुरेश पुंडलिक चौधरी, रामचंद्र पुंडलिक चौधरी, श्यामराव बाळणू पाटील,  भावराव घोलप यांच्या तब्बल ४०० ते ५०० फूट खोल असलेल्या बोअरवेलमधून  केबल वायर चोरी झाली. पंढरी अोंकार पाटील यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून सदर अर्जात प्रत्येकी २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून अशी चोरी मे २०१९ मध्ये पण झाली होती वारंवार अश्या चोर्या होत असल्याने पोलीस प्रशासनाने चोरी चा तपास त्वरित करून चोरट्यांना मुद्देमालासह पकडून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.