हिंगोणे शिवारातील बोरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू

0

अमळनेर | प्रतिनिधी 

हिंगोणे शिवारातील बोरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. दानिश शेख अरमान (वय १६) व शाहिदखा रहेमानखा मेवाती (वय १७) या दोन्ही युवकांचा यात समावेश असून, दानिश शेख अरमान याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, शाहीदखा मेवाती याचा नदीत शोध सुरू आहे.
कसाली भागातील सुमारे आठ ते दहा युवक बहादरपूर रस्त्यावरील हिंगोणे शिवारातील बोरी नदीत आज पोहण्यास गेले होते. पोहत असताना दानिश शेख अरमान यांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेला शाहिदखा रहेमानखा मेवाती याचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना पाहून भेदरल्याने उर्वरीत सहा ते सात युवक तेथून निघून गेले. परिसरातील भील नामक या तरूणाने दानिश शेख अरमानचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, दुसरा मृतदेह त्याला मिळून आला नाही. या घटनेची माहिती शहरात धडकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेचे अग्निशमनचे पथक लाइफ जॅकेट व यंत्रसामग्री घेऊन तेथे दाखल झाले. काही पट्टीचे पोहणारे तरूण, पालिकेचे कर्मचारी व पोलिसांच्या पथकाकडून दुसऱ्या युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.