पारोळा | लोकशाही न्यूज नेटवर्क
काल रात्री पावासाने चांगलाच जोर धरला होता. राज्यासह जिल्ह्याभरात पावसासाठी सक्रीय वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री १० : ३० नंतर सुमारे तासभर जोरदार वाढली विसांसह पावसाने चांगलेच झोडपले दरम्यान पारोळा तालुक्यातील एका गावात वीज पडून १५ मेंढ्या आणि १ बकरी दगावली आहे. सोबतच विजेचा धक्का बसून मेंढपाळ देखील जखमी झाला.
दामू भिल असे या मेंढपाळाचे नावं असून त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरात दामू भिल हे मेंढ्यांचा सांभाळ करून उदरनिर्वाह करीत होते. काल झालेल्या जोरदार पावसाने त्यांच्यावर नैसर्गिक संकटाने आघात केला. यात वीज पडून त्यांच्या १५ मेंढ्या आणि १ बकरी ठार झाल्याने मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
घटने प्रसंगी पोलीस पाटील बंडू पाटील कोतवाल, भरत पवार तलाठी प्रवीण शिंदे यांनी पंचनामा केला. दरम्यान या घटनेची मंत्री अनिल भाईदास पाटील यांना दाखल घेतली असून दूरध्वनीवर माहिती देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळासाठी नुकसानीची मागणी केले आहे. संबंधित नुकसानग्रस्त मेंढपाळच्या संदर्भात मान्य पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला आणि मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
.