हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले

0

वरणगाव | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचना करिता महत्वाचे असे भुसावळ तालूक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे रवीवार रोजी भल्या पहाटे साडे पाच वाजेला उघडण्यात आले.
उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणिसाढा संपुष्टात आला होता तसेच पावसाला  उशिरा सुरवात झाल्याने मधल्या काळात  धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणि पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाल्याने भयंकर जल सकटाचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता परंतू अशिरा का होईना जिल्हया सह विर्दभात पावसाने दमदार  हजेरी लावल्याने पुर्णा नदिला पुर  आल्याने धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला विर्दभात पावूस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर प्रशासने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे.  धरणातून चार दरवाज्या द्वारे ५० क्युमेक्स पाणि प्रति सेंकद तापी नदि पात्रात सोडण्यास येत आहे त्यामुळे तापी नदि खळखळून वाहू लागली आहे. सद्दय स्थितीत धरणाची जल पातळी  २०८ मिटर तर जलसादा १४६ दशलक्ष घना मिटर ऐवढा आहे. बऱ्हानपूर  येथे ११ .८ तर देढ तलाई येथे ४. ४ मिली मिटर पावूस पडल्याने धरणात पाण्याची आवक वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता एन्.पी. महाजन यांनी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.