सोने-चांदी पुन्हा महागली, जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण झाली होती. सोन्याचा भाव ४६ हजारांखाली आला होता. मागील आठ महिन्यातील हा नीचांकी स्तर आहे. गेल्या तीन आठवड्यात सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, कमॉडिटी बाजारात आज सोने आणि चांदी महागली आहे. आज सोने १३२ रुपयांनी वधारले आहे. तर चांदीमध्ये ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी बाजार बंद होताना सोने ४६१९० रुपयांवर स्थिरावले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता.

 

अर्थसंकल्पातील शुल्क कपात सोन्यासाठी नकारात्मक ठरली आहे. ग्राहकांसाठी सोने खरेदीची संधी आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्कात ५ टक्के कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यात सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले आहे.

 

good returns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१३० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६१३० रुपये आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४५१३० रुपये आणि २४ कॅरेटसाठी ४६१३० रुपये आहे.

 

दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४२० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ४९४५० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३७८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४७७६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५५७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये आहे.

 

आज सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १२० रुपयांनी वधारला असून तो प्रती १० ग्रॅम ४६३१७ रुपये झाला आहे. तर चांदीमध्ये ४७१ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६९४८३ रुपये झाला आहे. सराफा बाजारात गुरुवारी सोने ३२० रुपयांनी स्वस्त झाले होते. सोन्याचा भाव ४५८६७ रुपयांवर बंद झाला होता. चांदीमध्ये २८ रुपयांची किरकोळ तेजी दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ६८२८३ रुपयांवर बंद झाला होता. तर एमसीएक्सवर शुक्रवारी सोने दरात किरकोळ वाढ झाली. शुक्रवारी बाजार बंद होताना सोने ६४ रुपयांनी वधारले आणि ४६१९० रुपयांवर बंद झाले होते. तर चांदीचा भाव ६८९१४ रुपयांवर स्थिरावला. त्यात ४२० रुपयांनी वाढ झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.