सोने-चांदीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ ; तपासा नवे दर

0

मुंबई : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज सोने ६० रुपयांनी तर चांदी ३०० रुपयांनी महागली आहे. आजच्या भाव वाढीनंतर सोन्याचा भाव ४८५०८ रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीचा भाव ७१५४६ रुपये आहे.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७५९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४८५९० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६४० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१७९० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५७५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१७९० रुपये आहे.

यूएस फेडरल रिझर्वच्या बैठकीच्या अगोदर सोने कमजोर झाले आहे. त्यामुळे स्पॉट गोल्ड ०.६ टक्के घसरून १८६६ डॉलर प्रति औंसवर बंद झाले. अलीकडच्या आठवड्यांतील स्थिर सुधारणेनंतर यूएस अर्थ धोरणात बदलाच्या अपेक्षेमुळे या सराफा धातूने गेल्या आठवड्यापासून नुकसान दाखवले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.